new 
विदर्भ

आरोग्य संवर्धनासाठी गुढीपाव्याची शोभायात्रा रद्द

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून गुढीपाढवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदेला शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी आरोग्याच्या दृष्टीकोणातून शोभायात्रा स्थगित करण्यात आली असून समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनव पध्दतीने गुढीपाडवा साजरा करण्याचे ठरले असल्याचे मंगळवारी (ता.17) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कळविण्यात आले आहे.


प्रत्येक वर्षी या उपक्रमाला समाजातील सर्वस्तरातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत अकोलेकर नागरिक पारंपारिक पद्धतीने रांगोळी काढून, पारंपारिक वेशभूषेत नव वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी सुद्धाआयोजकांनी या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून व कोरोना व्हायरसचे संक्रमण कोणालाही होऊ नये द्याची विशेष खबरदारी म्हणून अशा सर्व प्रकारच्या यात्रा, जत्रा, मिरवणुका, संमेलन, परिसंवाद जिथे खूप मोठ्या प्रमाणात गदी होऊ शकते असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये, असे आवाहन केलेले आहे. शासनाच्या या आवाहनाला संस्कृती संवर्धन समितीनेही सकारात्मक प्रतिसाद देत व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करीत असताना जनतेच्या आरोग्याची काळजी घेत या वर्षी एका अभिनय उपक्रमाने नवीन वर्ष साजरे करण्याचे ठरविले आहे. नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक नागरिकाने आपल्या परासमोर रांगोळी काढून व आपल्या घरावर गुढी उभारतांना सोबत भगवे झेंडे लावत पारंपारिक पद्धतीने वेश परिधान करीत सर्वांना हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. राजकुमारजी हेडा, कार्याध्यक्ष हेमंत राजगुरू, कार्याध्यक्षा इंद्रायणी देशमुख, संयोजक महेश जोशी, सहसंयोजक स्वानंद कोडोलीकर, विभा संचालक श्री. नरेंद्र देशपांडे, दीपक मायी, शारदा बियाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिरांवर फडकणार भगवा ध्वज
यावर्षी अकोल्यातील सर्व प्रमुख मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव वर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यासाठी त्या मंदिरांमध्ये जाऊन मंदिरांच्या कळसावर नवीन ध्वज लावून तेथील विश्वस्तांना हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे.

आरोग्याची घ्या काळजी
नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे व कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता याबाबत जनजागृती करावी असेही आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT